YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 4:1-3

नहेम्या 4:1-3 MARVBSI

आम्ही कोट बांधत होतो हे सनबल्लटाने ऐकले तेव्हा त्याला मोठा क्रोध आला व तो यहूदी लोकांचा उपहास करू लागला. तो आपले बांधव व शोमरोनचे सैन्य ह्यांच्यासमोर म्हणाला, “हे दुर्बळ यहूदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आच खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगार्‍यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय?” त्याच्याजवळ अम्मोनी तोबीया होता तो म्हणाला, “ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकील.”