YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 3:6-11

नहेम्या 3:6-11 MARVBSI

जुन्या वेशीची डागडुजी यहोयादा बिन पासेहा व मशुल्लाम बिन बसोदया ह्यांनी करून तिला तुळया घातल्या, तिला कवाडे लावली आणि कड्या व अडसर लावले. त्यांच्या शेजारी मलत्या गिबोनी व यादोन मेरोनोथी ह्यांनी आणि गिबोन व मिस्पा येथील जे लोक महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांतांच्या अधिपतीच्या सत्तेखाली होते त्यांनी डागडुजी केली. त्यांच्या शेजारी सोनारांपैकी उज्जीएल बिन हरहया ह्याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी गांध्यांपैकी हनन्या ह्याने डागडुजी केली. त्यांनी रुंद कोटापर्यंत यरुशलेमेची मजबुती केली. त्यांच्या शेजारी यरुशलेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी रफाया बिन हूर ह्याने डागडुजी केली. त्यांच्या शेजारी यदाया बिन हरूमफ ह्याने आपल्या घरासमोरच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी हत्तूश बिन हशबन्या ह्याने डागडुजी केली. मल्कीया बिन हारीम आणि हश्शूब बिन पहथ-मवाब ह्यांनी दुसर्‍या एका भागाची व भट्टीबुरुजाची डागडुजी केली.