YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 12:1-11

नहेम्या 12:1-11 MARVBSI

शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व येशूवा ह्यांच्याबरोबर जे याजक व लेवी वर आले ते हे : सराया, यिर्मया, एज्रा, अमर्‍या, मल्लूख, हट्टूश, शखन्या, रहूम, मरेमोथ, इद्दो, गिन्नथोई, अबीया, मियामीन, माद्या, बिल्गा, शमया, योयारीब, यदया, सल्लू, आमोक, हिल्कीया व यदया; हे येशूवाच्या काळात याजकांतले व त्यांच्या बांधवांतले मुख्य होते. लेवी : येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, मत्तन्या व त्याचे भाऊबंद स्तुतिगायनाच्या कामावर होते; आणि त्यांचे भाऊबंद बकबुक्या व उन्नो त्यांच्याबरोबर पहार्‍यावर होते. येशूवाला योयाकीम झाला, योयाकीमाला एल्याशीब झाला, एल्याशीबाला योयादा झाला, योयादाला योनाथान झाला, व योनाथानाला यद्दूवा झाला.