मग ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व ‘आपण त्याला स्पर्श करावा’ अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले व त्याच्या डोळ्यांत थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?” तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीपण ती चालत आहेत.” नंतर त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले; तेव्हा त्याने निरखून पाहिले, आणि तो बरा झाला व सर्वकाही त्याला स्पष्ट दिसू लागले.
मार्क 8 वाचा
ऐका मार्क 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 8:22-25
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ