YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 7:24-30

मार्क 7:24-30 MARVBSI

मग तो तेथून निघून सोर व सीदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेल्लेणी असून सुरफुनीकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की, “माझ्या मुलीतून भूत काढा.” तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.” मग तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात.” तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.” मग ती आपल्या घरी गेली, तेव्हा मुलीला अंथरूणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.

मार्क 7:24-30 साठी चलचित्र