YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 7:18-23

मार्क 7:18-23 MARVBSI

तो त्यांना म्हणाला, “तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हांला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपात बाहेर पडते.” अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले. आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोर्‍या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात.”

मार्क 7:18-23 साठी चलचित्र