YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 5:37-42

मार्क 5:37-42 MARVBSI

त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकार्‍याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व आकांत करणारे ह्यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले; पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले, आणि मुलीचे आईबाप व आपल्याबरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, “तलीथा कूम;” ह्याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ.” आणि लगेचच ती मुलगी उठून चालू लागली; कारण ती बारा वर्षांची होती. तेव्हा ते अत्यंत आश्‍चर्यचकित झाले.

मार्क 5:37-42 साठी चलचित्र