YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 5:15-19

मार्क 5:15-19 MARVBSI

ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्याच्यात सैन्य होते तो, बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला; आणि त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा ‘आपण आमच्या प्रांतातून निघून जावे’ असे ते त्याला विनवू लागले. मग तो मचव्यावर जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की, ‘मला आपल्याजवळ राहू द्या.’ परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा; प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.”

मार्क 5:15-19 साठी चलचित्र