YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 2:18-22

मार्क 2:18-22 MARVBSI

योहानाचे शिष्य व परूशी उपास करत होते; तेव्हा लोक येऊन त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूश्यांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय?” येशू त्यांना म्हणाला, “वर्‍हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय? वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही. तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल; तेव्हा त्या दिवसांत ते उपास करतील. कोणी कोर्‍या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही; लावले तर धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्याला, म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो व बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यांत घालतात.”

मार्क 2:18-22 साठी चलचित्र