काही दिवसांनी तो पुन्हा कफर्णहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारातदेखील त्यांना जागा होईना; तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षाघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना, म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षाघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” कित्येक शास्त्री तेथे बसले होते; त्यांच्या मनात असा विचार आला की, ‘हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करतो; एकावाचून म्हणजे देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?’ ते स्वतःशी असा विचार करत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने1 लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता?
मार्क 2 वाचा
ऐका मार्क 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 2:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ