YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 15:42-47

मार्क 15:42-47 MARVBSI

ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती; हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाथाच्या आदला दिवस होता. म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिंमत धरून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले; हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता. तेव्हा तो इतक्यात कसा मेला ह्याचे पिलाताला नवल वाटले; आणि त्याने शताधिपतीला बोलावून घेऊन विचारले, “त्याला मरून बराच वेळ झाला की काय?” शताधिपतीकडून ते कळल्यावर त्याने ते शव योसेफाच्या स्वाधीन केले. त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्याभोवती गुंडाळले; मग त्याला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले व कबरेच्या तोंडाशी धोंड लोटून बसवली. त्याला कोठे ठेवले हे मग्दालीया मरीया व योसेची आई मरीया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या.

मार्क 15:42-47शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती