YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:26-31

मार्क 14:26-31 MARVBSI

मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगराकडे निघून गेले. नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व जण आज रात्री माझ्यामुळे अडखळून पडाल; कारण असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’ तरी माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्यापुढे मी गालीलात जाईन.” पेत्र त्याला म्हणाला, “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, आज म्हणजे ह्याच रात्री, कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” तरी तो फार आवेशाने बोलत राहिला, “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही.” सर्व जणही तसेच म्हणत होते.

मार्क 14:26-31शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती