YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 12:28-33

मार्क 12:28-33 MARVBSI

तेव्हा शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, सर्वांत पहिली ही की, ‘हे इस्राएला, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;’ आणि ‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’ दुसरी ही की, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर.’ ह्यांपेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.” तो शास्त्री त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ठीक व खरे बोललात की, ‘देव एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही;’ आणि ‘संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे’ आणि ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती करणे’ हे सर्व ‘होमार्पण व यज्ञ’ ह्यांपेक्षा अधिक आहे.”