[देवाचा पुत्र] येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, “पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो; तो तुझा मार्ग तयार करील; अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली, ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा; त्याच्या ‘वाटा नीट करा.”’ त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला. तेव्हा सगळा यहूदीया देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे. तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षा समर्थ असा कोणीएक माझ्यामागून येत आहे; त्याच्या पायतणांचा बंद लवून सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.”
मार्क 1 वाचा
ऐका मार्क 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 1:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ