मत्तय 9:9-12
मत्तय 9:9-12 MARVBSI
मग तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला. नंतर असे झाले की, तो घरात बसला असता, पाहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले. हे पाहून परूशी त्याच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?” हे ऐकून तो म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे.

