YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 9:18-22

मत्तय 9:18-22 MARVBSI

तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पाहा, कोणीएक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल.” तेव्हा येशू उठला व त्याच्यामागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पाहा, बारा वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन.” तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली.