YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 8:28-34

मत्तय 8:28-34 MARVBSI

मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले; ते इतके अक्राळविक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे येशू, देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पिडण्यास येथे आला आहेस काय?” तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भुते त्याला विनंती करू लागली की, “तू जर आम्हांला काढत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हांला पाठवून दे.” त्याने त्यांना म्हटले, “जा.” मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटण्यास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली.