YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 8:18-22

मत्तय 8:18-22 MARVBSI

मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातील पाखरांना कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही.” मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, “प्रभूजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरण्यास जाऊ द्या.” येशूने त्याला म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांस पुरू दे.”