YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 4:12-17

मत्तय 4:12-17 MARVBSI

नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालीलात निघून गेला; आणि नासरेथ सोडून जबुलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनार्‍यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला; हे अशासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “जबुलून प्रांत व नफताली प्रांत, समुद्रकिनार्‍यावरचा, यार्देनेच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालील - अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.” तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की, “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”