कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले; पण आपल्याबरोबर तेल घेतले नाही; शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यांत तेलही घेतले. मग वराला विलंब लागला व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, ‘पाहा, वर आला आहे, त्याला सामोर्या चला.’ मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, ‘तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत.’ पण शहाण्यांनी उत्तर दिले की, ‘कदाचित आम्हांला व तुम्हांलाही पुरणार नाही; तुम्ही विकणार्यांकडे जाऊन स्वतःकरता विकत घ्यावे हे बरे.’ त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला; तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसर्याही कुमारी येऊन म्हणाल्या, ‘प्रभूजी, प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही.’ म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
मत्तय 25 वाचा
ऐका मत्तय 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 25:3-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ