तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हांला धरून देतील व तुम्हांला जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्या वेळी ‘पुष्कळ जण अडखळतील’, एकमेकांना धरून देतील, व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील. आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.
मत्तय 24 वाचा
ऐका मत्तय 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 24:9-14
७ दिन
वाळवंटाचा हंगाम असा असतो जो आपल्याला अनेकदा हरवलेला, सोडलेला आणि सोडल्याचा अनुभव देतो. तथापि, वाळवंटाबद्दल मनोरंजक गोष्ट अशी आहे की ते दृष्टीकोन बदलते, जीवन बदलते आणि निसर्गात विश्वास निर्माण करते. तुम्ही ही योजना करत असताना माझी प्रार्थना आहे की तुम्ही वाळवंटाचा राग धरू नका तर ते स्वीकारू नका आणि देवाला तुमच्यामध्ये त्याचे काही चांगले कार्य करू द्या.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ