YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 22:41-46

मत्तय 22:41-46 MARVBSI

परूशी एकत्र जमले असता येशूने त्यांना विचारले, “ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे?” ते त्याला म्हणाले, “दाविदाचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग दावीद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो? ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’ दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार?” तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्याला उत्तर देता येईना आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचारण्यास कोणीही धजला नाही.