YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 20:8-12

मत्तय 20:8-12 MARVBSI

मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभार्‍याला म्हणाला, ‘कामकर्‍यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे.’ तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास कामावर घेतले होते ते आल्यावर त्यांना रुपया-रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले. तरी त्यांनाही रुपया-रुपयाच मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरकुर करत म्हटले, ‘ह्या शेवटल्यांनी एकच तास काम केले, आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हांला व त्यांना आपण सारखे लेखले.’