मत्तय 20:32-34
मत्तय 20:32-34 MARVBSI
येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, आमचे डोळे उघडावे.” तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; तेव्हा त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्यामागून चालले.

