YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 20:29-34

मत्तय 20:29-34 MARVBSI

मग ते यरीहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून चालला. तेव्हा पाहा, वाटेवर बसलेले दोन आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, “हे प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.” त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले; तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, “प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.” येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, आमचे डोळे उघडावे.” तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; तेव्हा त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्यामागून चालले.