मत्तय 20:13-15
मत्तय 20:13-15 MARVBSI
तेव्हा त्याने त्यांतील एकाला उत्तर दिले, ‘गड्या, मी तुझ्यावर अन्याय करत नाही; तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? तू आपला रुपया घेऊन चालायला लाग; जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय?’

