तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, “प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?” येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले. आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करण्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की, ‘तो, त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी.’ तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, ‘मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन.’ तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला, त्याच्याकडे त्याचे शंभर रुपये येणे होते; तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, ‘तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक.’ ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, ‘मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन.’ पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले.
मत्तय 18 वाचा
ऐका मत्तय 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 18:21-30
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ