YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 16:15-20

मत्तय 16:15-20 MARVBSI

तो त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात.” येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना निक्षून सांगितले की, “मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका.”