YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 12:9-14

मत्तय 12:9-14 MARVBSI

नंतर तो तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला. आणि पाहा, तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता; तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारले, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून ते शब्बाथ दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? तर मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे! ह्यास्तव शब्बाथ दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे.” मग त्याने त्या माणसाला म्हटले, “तुझा हात लांब कर.” तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसर्‍या हातासारखा झाला. नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली.