YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 12:38-45

मत्तय 12:38-45 MARVBSI

तेव्हा शास्त्री व परूशी ह्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, “गुरूजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे.” त्याने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्‍चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील; कारण ती शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. मग तो म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन;’ आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात; मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते; तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.