पण हे ओळखून येशू तेथून निघाला; तेव्हा बरेच लोक त्याच्यामागे चालले व त्या सर्वांना त्याने बरे केले; आणि मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली. ह्यासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे; तो मला परमप्रिय आहे; त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. तो भांडणार नाही व ओरडणार नाही, व रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल, आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.”
मत्तय 12 वाचा
ऐका मत्तय 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 12:15-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ