YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 11:20-24

मत्तय 11:20-24 MARVBSI

नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला : “हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्‍चात्ताप केला असता. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सीदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत उंचावलेला होशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील;’ कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल.”