YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 11:2-15

मत्तय 11:2-15 MARVBSI

योहान बंदिशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले, “जे येणार आहेत ते आपणच, की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?” येशूने त्यांना उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा; ‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’; जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.” ते जात असता येशू लोकसमुदायांबरोबर योहानाविषयी बोलू लागला : “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वार्‍याने हलवलेला बोरू काय? तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात. तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? मी तुम्हांला सांगतो, हो; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला. ‘पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवतो, तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही; तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या दिवसांपासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत. कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्यांनी संदेश दिले; आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलीया येणार तो हाच आहे. ज्याला कान आहेत तो ऐको.