अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी. अब्राहामाला इसहाक झाला; इसहाकाला याकोब; याकोबाला यहूदा व त्याचे भाऊ झाले; यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेसाला हेस्रोम झाला; हेस्रोमाला अराम झाला; अरामाला अम्मीनादाब; अम्मीनादाबाला नहशोन; नहशोनाला सल्मोन; सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रूथपासून ओबेद; ओबेदाला इशाय; आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शलमोन झाला; शलमोनाला रहबाम; रहबामाला अबीया; अबीयाला आसा; आसाला यहोशाफाट; यहोशाफाटाला योराम; योरामाला उज्जीया; उज्जीयाला योथाम; योथामाला आहाज; आहाजाला हिज्कीया; हिज्कीयाला मनश्शे; मनश्शेला आमोन; आमोनाला योशीया; आणि बाबेलास देशांतर झाले त्या वेळी योशीयाला यखन्या व त्याचे भाऊ झाले. बाबेलास देशांतर झाल्यावर यखन्याला शल्तीएल झाला. शल्तीएलाला जरूब्बाबेल; जरूब्बाबेलाला अबीहूद; अबीहूदाला एल्याकीम; एल्याकीमाला अज्जुर; अज्जुराला सादोक; सादोकाला याखीम; याखीमाला एलीहूद; एलीहूदाला एलाजार; एलाजाराला मत्तान; मत्तानाला याकोब; आणि याकोबाला योसेफ झाला. ज्या मरीयेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती. ह्याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या; दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या; आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.
मत्तय 1 वाचा
ऐका मत्तय 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 1:1-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ