पुढे असे झाले की, त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने यरुशलेमेस जाण्याच्या दृढनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले; तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले; पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख यरुशलेमेकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, “प्रभूजी, ‘आकाशातून अग्नी पडून’ त्यांचा ‘नाश व्हावा’ म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय?”1 त्याने वळून त्यांना धमकावले.2 मग ते दुसर्या गावास गेले. तेव्हा असे झाले की, ते वाटेने चालत असता कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही.” त्याने दुसर्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये;” परंतु तो म्हणाला, “प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या.” तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे; तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.” त्यावर आणखी एकाने म्हटले, “प्रभूजी, मी आपल्यामागे येईन; परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या.” येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही.”
लूक 9 वाचा
ऐका लूक 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 9:51-62
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ