नंतर असे झाले की, दुसर्या दिवशी ते त्या डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला येऊन भेटला. तेव्हा पाहा, समुदायातून एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरूजी, मी आपल्याला विनंती करतो, माझ्या मुलावर कृपादृष्टी करा; कारण हा माझा एकुलता एक आहे; आणि पाहा, कोणीएक आत्मा त्याला धरतो, आणि हा एकाएकी ओरडतो; मग तो ह्याला असा पिळतो की ह्याला फेस येतो; तो ह्याला पुष्कळ ठेचतो व ह्याला सोडता सोडत नाही. त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना तो काढता येईना.” येशूने म्हटले, “अहो विश्वासहीन व कुटिल पिढीचे लोकहो, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण.” तो जवळ येत आहे इतक्यात भुताने त्याला आपटले व पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले; आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले. देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले.
लूक 9 वाचा
ऐका लूक 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 9:37-43
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ