YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 7:44-47

लूक 7:44-47 MARVBSI

तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तुम्ही माझा मुका घेतला नाही; परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही; परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले. ह्या कारणास्तव मी तुम्हांला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो.”

लूक 7 वाचा

ऐका लूक 7

संबंधित व्हिडिओ