YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 5:4-7

लूक 5:4-7 MARVBSI

आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, “खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.” शिमोनाने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यांत सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसर्‍या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले.

लूक 5 वाचा

ऐका लूक 5

संबंधित व्हिडिओ