तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी आश्चर्य करू लागले; ते म्हणू लागले, “हा योसेफाचा पुत्र ना?” त्याने त्यांना म्हटले, “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, ‘हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर; कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर.”’ पुढे तो म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हांला खरे ते सांगतो की, एलीयाच्या दिवसांत साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या; तरी त्यांच्यातील एकीच्याहीकडे एलीयाला पाठवले नव्हते; तर ‘सीदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे’ मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलीशा संदेष्ट्याच्या काळात इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते; तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, तर सूरियाचा नामान मात्र शुद्ध झाला.” हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले, आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले. पण तो त्यांच्यामधून निघून गेला.
लूक 4 वाचा
ऐका लूक 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 4:22-30
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ