YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 24:36-50

लूक 24:36-50 MARVBSI

ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते.” असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले. मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्‍चर्य करत असता त्याने त्यांना म्हटले, “येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?” मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा [व मधाच्या पोळ्याचा काही भाग] दिला. तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्ला. मग तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यांत माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे.” तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले; आणि त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख सोसावे, तिसर्‍या दिवशी मेलेल्यांतून उठावे, आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्‍चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात. पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरुशलेम शहरात राहा.” नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला.

संबंधित व्हिडिओ