मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस, आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना [प्रभू येशूचे] शरीर सापडले नाही. मग असे झाले की, त्याविषयी त्यांना भ्रांत पडली, तेव्हा पाहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, “तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही, तर उठला आहे; तो गालीलात होता तेव्हाच त्याने तुम्हांला काय सांगितले ह्याची आठवण करा; ते असे की, मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे, व तिसर्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.” तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली; आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मग्दालीया मरीया, योहान्ना व याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसर्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले; परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली; व ते त्यांनी खरे मानले नाही. [तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओणवे होऊन त्याने आत पाहिले तेव्हा त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली; आणि झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करत तो घरी गेला.]
लूक 24 वाचा
ऐका लूक 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 24:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ