YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 2:1-7

लूक 2:1-7 MARVBSI

त्या दिवसांत असे झाले की, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्याची आज्ञा झाली. क्‍विरीनिय हा सूरियाचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला, व नावनिशी लिहून देण्यासाठी, त्याला वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की, तिचे दिवस पूर्ण भरले; आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती.

लूक 2 वाचा

ऐका लूक 2