YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 16:5-15

लूक 16:5-15 MARVBSI

मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकर्‍यास बोलावले आणि पहिल्याला म्हटले, ‘माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर मण तेल.’ त्याने त्याला म्हटले, ‘हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर पन्नास मांड.’ नंतर दुसर्‍याला म्हटले, ‘तुला किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर खंड्या गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हा तुझा रोखा घे व ऐंशी मांड.’ अन्यायी कारभार्‍याने शहाणपण केले. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक आपल्या-सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा; ह्यासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांला सार्वकालिक वस्तीत घ्यावे. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाहीत तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल? आणि जे दुसर्‍यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाहीत तर जे आपले आहे ते तुम्हांला कोण देईल? कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्‍यावर प्रीती करील; अथवा एकाला धरून राहील व दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.” धनलोभी परूशी हे सर्व ऐकत होते व त्याला हसत होते. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे.

संबंधित व्हिडिओ