YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 1:39-48

लूक 1:39-48 MARVBSI

त्या दिवसांत मरीया डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावास घाईघाईने गेली; आणि जखर्‍याच्या घरी जाऊन तिने अलीशिबेला अभिवादन केले. तेव्हा असे झाले की, अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली; आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, “स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्लासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.” तेव्हा मरीया म्हणाली : “‘माझा जीव प्रभूला’ थोर मानतो, आणि ‘देव जो माझा तारणारा’ त्याच्यामुळे माझा आत्मा ‘उल्लासला आहे.’ कारण ‘त्याने’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे.’ पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील!

लूक 1 वाचा

ऐका लूक 1