YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 26:40-45

लेवीय 26:40-45 MARVBSI

त्यांनी माझ्याविरुद्ध अपराध केला ह्यात त्यांची व त्यांच्या वाडवडिलांची दुष्टता होय असे ते कबूल करतील, तसेच ते माझ्याविरुद्ध चालले ह्या कारणामुळे मीही त्यांच्याविरुद्ध होऊन त्यांना शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील, आणि त्यांचे अशुद्ध2 ह्रदय लीन होऊन ते आपल्या दुष्टतेचा दंड मान्य करतील. तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी स्मरेन. त्याचप्रमाणे इसहाकाशी केलेला करार व अब्राहामाशी केलेला करार ह्यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन. त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि त्यांच्यावाचून ओस असेपर्यंत तो आपले शब्बाथ उपभोगत राहील; त्यांनी माझ्या निर्बंधांचा अव्हेर केला व माझे विधी तुच्छ मानले म्हणूनच त्यांच्या दुष्टतेबद्दल केलेली शिक्षा ते मान्य करतील. इतके झाले तरी ते आपल्या शत्रूंच्या देशात असताना त्यांचा समूळ नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नाकार करणार नाही अथवा त्यांना मी तुच्छ मानणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे; मी त्यांच्याकरता त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून मी सर्व राष्ट्रांदेखत त्यांना मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी परमेश्वर आहे.”