मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली. यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वसत आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते. त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की, “जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.” ह्याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.
यहोशवा 6 वाचा
ऐका यहोशवा 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहोशवा 6:24-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ