YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 24:14-18

यहोशवा 24:14-18 MARVBSI

तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो; कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हांला व आमच्या पूर्वजांना मिसर देशातून, दास्यगृहांतून काढून आणले; त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला आणि ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्याने आमचे संरक्षण केले; आणि ह्या देशात राहणार्‍या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्यापुढून घालवून दिले; आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे.”