परमेश्वराने अमोर्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; “हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोर्यावर स्थिर हो.” तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता. मग यहोशवा सर्व इस्राएलांसह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.
यहोशवा 10 वाचा
ऐका यहोशवा 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहोशवा 10:12-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ