विपन्नाला प्रकाश का मिळतो? जे मनाचे दुःखी त्यांना जीवन का प्राप्त होते? ते मृत्यूची उत्कट अपेक्षा करतात, पण तो येत नाही; गुप्त निधीसाठी खणणार्यांपेक्षा ते मृत्यूच्या प्राप्तीसाठी अधिक खटाटोप करतात; त्यांना शवगर्ता प्राप्त झाली म्हणजे ते हर्ष करतात, त्यांना अत्यानंद होतो. ज्या पुरुषाचा मार्ग गुप्त आहे, ज्याला देवाने कुंपण करून कोंडले आहे अशाला प्रकाश का प्राप्त होतो? मला तर अन्नाऐवजी उसासे प्राप्त होत आहेत, माझा आक्रोश जलधारांप्रमाणे वाहत आहे. मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. कशानेही मला थरकाप झाला तर ते माझ्यावर येते. मी निश्चिंत, स्वस्थ व विश्रांत नाही, तरीदेखील मला आणखी क्लेश प्राप्त होत आहेत.”
ईयोब 3 वाचा
ऐका ईयोब 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 3:20-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ