देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय-निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे; कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”
योहान 3 वाचा
ऐका योहान 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 3:16-21
8 दिवस
तुम्ही कधीच एकटे नाही. तुम्ही एका दिवसापासून किंवा 30 वर्षांपासून तुमच्या ख्रिस्ती विश्वासात आहात, असाल. जीवन तुम्हाला ज्या गोष्टींचे आव्हान देऊ शकते त्या सर्वांसाठी हे सत्य ठामपणे उभे आहे.. या योजनेत देवाची मदत प्रभावीपणे कशी स्वीकारावी हे शिका. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या “या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ